स्वामिनी सावरकर यांचे निधन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्नुषा आणि हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे आज पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 84  वर्षांच्या होत्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी आयुष्यभर विक्रमराव सावरकर यांना त्यांच्या संघटन कार्यात साथ दिली. ‘प्रज्वलंत’ या सावरकरांच्या विचारांवरील मासिकाचे कामकाज त्यांनी सांभाळले.