मुजफ्फरपूरविषयी प्रश्न विचारणाऱ्या अँकरला स्वरा भास्करने तडकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बिहार येथील मुजफ्फरपूर प्रकरणावरून टीका करणाऱ्या एका अँकरला अभिनेत्री स्वरा भास्करने चांगलंच तडकावलं आहे. रोहित सरदाना असं या अँकरचं नाव आहे. कठुआ प्रकरणी आवाज उठवणारे बॉलिवूड आता मुजफ्फरपूर प्रकरणात शांत का आहे, अशा अर्थाचं ट्वीट रोहित यांनी केलं होतं. त्यावर स्वरा भास्करने त्यांना प्रतिक्रिया दिली आहे.

बिहार येथील मुजफ्फरपूर प्रकरणात ३४ मुलींसोबत बलात्कार झाले. अजून कुठल्याही बॉलिवूडवाल्याने त्यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मी फक्त विचारतोय, असं ट्वीट रोहित यांनी केलं होतं. त्यावर उत्तर दिताना स्वराने, ”त्याचं काय आहे की, आम्ही बॉलिवूडवाले तर सरकार चालवत नाही. तुमचा हा प्रश्न तुम्ही फक्त सत्ताधाऱ्यांना का नाही विचारत”, असं उत्तर दिलं आहे.

या ट्विटवॉरमुळे नेटकऱ्यांना मात्र चर्चेचा विषय मिळाला आहे. या ट्विट्सवर स्वरा आणि रोहित दोन्हींच्या समर्थकांची ट्विटरवरच खडाजंगी सुरू झाली आहे.