पुण्यातील विमाननगरमध्ये सराईतांकडून तरुणावर वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाद मिटविल्याच्या रागातून सराईत गुन्हेगारांनी तरुणावर वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री विमाननगरमध्ये  घडली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी तुषार बनसोडे, महेश बलभीम सरोदे, आकाश घोडेस्वार, करण भरत सोनवने यांना अटक करण्यात आली आहे. विशाल कापसे  असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश, आकाश आणि करण हे  सराईत गुन्हेगार आहेत. दोन दिवसांपूर्वी फिर्यादीच्या मामाचा मुलगा करण तुजारे आणि आरोपीमध्ये वाद झाले होते. हे वाद विशालने मिटवले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.

काल रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास तुषार, महेश, आकाश, करण हे विमाननगर परिसरात तलवारी घेऊन आले. त्यांनी विशालवर तलवारीने वार करत जखमी केले.