भयंकर! भावाने केला अकरा वर्षाच्या बहिणीवर बलात्कार

1887

अर्जेंटीना मधील पसोडास येथे बहिण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. पंधरा वर्षीय सख्ख्या भावाने धाकट्या 11 वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, आरोपी भाऊ अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे कळताच घरातल्यांना जबर धक्का बसला. त्यांनी याबद्दल मुलीला विचारले. पण आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला आहे हेच तिला कळत नव्हते व सांगताही येत नव्हते. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर समाज विकास विभागाने आरोपीला ताब्यात घेत कुटुंबापासून वेगळे केले आहे. तसेच पीडित मुलगी व तिच्या बाळाच्या जीवाला धोका असून जर यात बाळं वाचले तर त्याचा ताबा त्याच्या आजीकडे म्हणजेच पीडितेच्या आईकडे दिला जाणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या