लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर अखेर तापसीने सोडले मौन

बॉलीवूड अभिनेत्री Taapsee Pannu ने तिचा प्रियकर मॅथियास बोईशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. परंतु तापसीने याबाबत कोणताही खुलासा केला नव्हता. तापसीच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या माध्यातून समोर आली होती. दरम्यान, अखेर तापसीने तिच्या लग्नाबाबत मौन सोडले असून अनेक खुलासे केले आहेत.

नेटकऱ्यांना आणि तापसीच्या चाहत्यांना तिच्या लग्नाचा व्हिडिओ आणि फोटो पाहण्याची ईच्छा होती. यावर तापसीने तिचे लग्न गुप्त ठेवण्याचा निर्णय का घेतला याचे कारण दिले आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत तापसीला ती तिच्या लग्नाबाबत आणि लग्नाचे फोटो कधी शेअर करणार याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी तिने लग्नाबाबतची माहिती अजून का शेअर केली नाही याची अनेक कारणे दिली.

तापसीने या प्रश्नांचे उत्तर देताना ती म्हणाली, मला नाही माहित की मी कितपत या सगळ्या गोष्टी सांभाळू शकते. मी माझ्या लग्नाची माहिती किंवा त्याचे फोटो तुमच्यासोबत शेअर करेन की नाही याची देखील मला खात्री नाही. कारण आजकाल लोग सहज एकदुसऱ्य़ाला जज करतात. खर सांगायच झाल तर मी या सगळ्यासाठी मानसिकदृष्ट्या तयारही नाहीय. मला कधीच माझे लग्न गुप्त ठेवायचे नव्हते पण लोकांनी लग्नाबाबत टिपणी करावी असे मला वाटत नाही असे तापसी म्हणाली.

Taapsee Pannu Wedding : लग्नानंतर तापसी पन्नूच्या संगीत समारंभाचा व्हिडिओ व्हायरल