
टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ गेल्या 12 वर्षापासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. या दरम्यान कितीतरी नवीन मालिका आल्या आणि गेल्या, मात्र चाहत्यांच्या मनातील या मालिकेचे स्थान कायम वरच राहिले. टीआरपीच्या रेसमध्ये देखील ही मालिका कायम अव्वल मालिकांमध्ये राहिली. आजही या मालिकेतील कलाकारांच्या मजेशिर भूमिका आणि संवाद चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतात.
‘हसा आणि हसवत रहा’ हा एकच कानमंत्र घेऊन चित्रित केल्या जाणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची कथा ‘गोकुलधाम’ सोसायटी आणि गडा फॅमिली भोवती फिरत राहते. गोकुलधाममधील जेठालाल, दयाबेन, चंपकचाच आणि टिपेद्र उर्फ टप्पू गडा यांच्या घरात रोज घडणाऱ्या वेगवेगळ्या किस्स्यामुळे चाहत्यांचे हसून हसून पोट दुखते. याला बबिता, अय्यर, डॉ. हाथी, पोपटलाल, तारक मेहता, भिडे मास्तर, टप्पूसेना यांचीही साथ मिळतेच.
मालिकेमध्ये जेठालाल हे प्रमुख पात्र असून दिलीप जोशी यांनी हे पात्र साकारले आहे. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या जेठालालला एका एपिसोडचे किती पैसे मिळतात हे तुम्हाला माहिती का? याबाबत झुप डीलिटने दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी हे या मालिकेतील सर्वाधिक सॅलरी घेणारे कलाकार असून ते एका एपिसोडचे दीड लाख रुपये घेतात. दिलीप जोशी याच्यानंतर दयाबेन यांची भूमिका करणाऱ्या दिशा वाकानी यांना सर्वाधिक पैसे मिळत होते. मात्र सध्या त्या या मालिकेपासून लांब आहेत.
सध्या दिलीप जोशी यांच्यानंतर तारक मेहता अर्थात शैलेश लोढा यांना एका एपिसोडचे एक लाख रुपये मिळतात. तर गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे अर्थात मंदार चंदवाडकर यांना एका एपिसोडचे 80 हजार, बबिता उर्फ मुनमुन दत्ता हिला 50 हजार मिळतात.
‘तारक मेहता का…’ मालिकेमध्ये ट्विस्ट, गेल्या 12 वर्षात जे नाही घडले ते आता घडणार
जेठालालच सर्वस्व
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेची टीआरपी घसरल्याचे वृत्त आले होते. मात्र या मालिकेचे प्रोड्यूसर असित मोदी यांनी या अफवा असल्याचे म्हटले. तसेच सध्या कोरोनाची परिस्थिती असून या काळातही चित्रिकरण सुरू असून नवनवीन स्टोरी दाखवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तसेच जेठालाल हेच ‘ओपनिंग बॅट्समन’, ‘ओपनिंग बॉलर’ आणि ‘कर्णधार’ असल्याचे ते म्हणाले.


























































