‘तारक मेहता का…’ फेम अभिनेत्री मुनमुन दत्ताचा जर्मनीमध्ये अपघात, चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडते. गोकुलधाम सोसायटी आणि यात राहणाऱ्या सदस्यांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळाले. याच सोसायटीतील महत्त्वाचे पात्र म्हणजे बबिता. या मालिकेतील प्रमुख पात्र असणारा जेठालाल ज्या बबिताच्या मागेपुढे गोंडा घोळत राहतो तिची भूमिका साकारलीय ती अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने.

मुनमुन दत्ता सध्या विदेशात सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र तिच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी असून मुनमुनचा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. मुनमुन दत्ता हिचा जर्मनीमध्ये अपघात झाला आहे. याची माहिती तिने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे. भटकंतीची आवड असणाऱ्या मुनमुनने एक आठवड्यांपूर्वी युरोपची ट्रिप सुरू केली होती. आतापर्यंत ती स्विट्जर्लंड आणि जर्मनी फिरली आहे. मात्र दुर्दैवाने तिचा जर्मनीमध्ये अपघात झाला आहे. त्यामुळे ती मायदेशी परतण्याच्या बेतात आहे.

इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत मुनमुन दत्ता हिने अपघाताची माहिती दिली आहे. ‘जर्मनीमध्ये माझा छोटासा अपघात झाला आहे. माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे मला ट्रिप अर्धवट सोडून घरी परतावे लागत आहे’, अशी पोस्ट मुनमुन दत्ताने शेअर केली आहे. सोबत तिने ह्रदय तुटल्याचा इमोजीही शेअर केलाय. अर्थात ट्रिप अर्धवट सोडून यावे लागत असल्याने ती नाराज झाली आहे.

दरम्यान, जर्मनीला जाण्यासाठी तिने स्विट्जर्लंडमध्ये दोन दिवस मुक्काम केला होता. स्विट्जर्लंडमध्ये तिने हॉट चॉकलेटचाही आनंद लुटला होता. त्यानंतर स्विट्जर्लंडच्या इंटरलेकनहून रेल्वेने ती जर्मनीमध्ये दाखल झाली होती. येथे एकाच्या घरी थांबल्यानंतर तिने तेथील जेवणाचा फोटोही तिने पोस्ट केला होता. तसेच मुनमुनने रोमान्ससाठी बॉलिवूडकरांचे आवडता चित्रिकरण स्पॉट असणाऱ्या जागेचे फोटोही शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ‍♀️ (@mmoonstar)

दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत मुनमुन दत्ता हिची प्रमुख भूमिका आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या मालिकेचा भाग आहे. जेठालाल गडा आणि बबिता यांच्यातील मस्ती चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ‍♀️ (@mmoonstar)