लाच घेताना तलाठ्याला पकडले, लाचलुचपत विभागाची वर्षभरातील पहिलीच कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदाच्या वर्षातील पहिलीच कारवाई केली आहे. मृत आईचे सातबारावरून नाव कमी करून सातबाराचा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच घेताना निवळी येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले.

गेल्या सहा महिन्यांतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही पहिलीच कारवाई आहे. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर येत आहे. तक्रारदार व्यक्तीच्या मृत आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करून सातबारा उताऱ्याची नोंद देण्यासाठी निवळी गावातील तलाठी राजेश गुसिंगे (37) याने 2 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती पंधराशे रुपये रक्कम ठरली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रविण कदम, सहाय्यक फौजदार ओगले, हवालदार नलावडे, आंबेकर, गावकर यांनी सापळा रचला आणि राजेश गुसिंगे याला निवळी येथे 1500 रुपयांची लाच घेताना पकडले.