विनोद कुमार चौधरींचे अजब टॅलेंट! नाका – तोंडाने करतात टायपिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जलदगतीने टायपिंग करणारे आपण खूपजण बघतो. मात्र कधी नाका-तोंडाने टायपिंग करणारा व्यक्ती ऐकलाय का… ऐकून विचित्र वाटतं ना… पण आपल्या देशात असे अजब टॅलेंट असलेला व्यक्ती आहे आणि त्याच्या कौशल्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’नेही घेतली आहे. विनोद कुमार चौधरी असे त्यांचे नाव आहे.

विनोद कुमार चौधरी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत कॉम्प्युटर ऑपरेटर आहेत. त्यांच्या नावावर नऊ ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ आहेत. त्यापैकी आठ टायपिंगचे आहेत. विनोद डोळ्यांवर पट्टी बांधून आणि तोंडात स्टिक धरून टाइप करतात. ते नाकानेही टायपिंग करतात. 2014 साली त्यांनी आपला पहिला रेकॉर्ड नोंदवला होता. तेव्हापासून ते स्वतःचेच रेकॉर्ड मोडत आहेत. याविषयी विनोद चौधरी म्हणाले, मला वेगाची आवड आहे. मी पहिला रेकॉर्ड 2014 साली नोंदवला. त्यावेळी मी नाकाने 44.30 सेकंदांत 103 अक्षरे टाइप केली. त्यानंतर नवनवीन रेकॉर्ड करायची जिद्द निर्माण झाली.