तालिबानचा ‘यू टर्न’, नोकरदार महिलांना घरीच राहण्याचा सुनावला फर्मान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबान देशात सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांना घरातच राहण्यास सांगितलं आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, तालिबान सैन्याला महिलांचा आदर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. याआधी पत्रकार परिषदेत तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांना इस्लाम धर्मातील शरियत कायद्यानुसार अधिकार दिले जातील, असे म्हटले होते.

तालिबान राजवटीत महिलांना नोकरी करण्याचे स्वातंत्र्य आहे?

1990 च्या दशकात जेव्हा तालिबानची अफगाणिस्तात सत्ता होती, तेव्हा अफगाण महिलांना काही अटींसह फक्त घरातून बाहेर निघण्याची परवानगी होती. याचे उल्लंघन केल्यास महिलांना कटोरा शिक्षा दिली जात होती. मात्र तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर पत्रकार परिषदेत यावेळी त्यांची राजवट पूर्वीपेक्षा वेगळी असेल, असं सांगितलं होत. प्रवक्त्यांनी सांगितले होते की, तालिबानच्या राजवटीत महिलांना काम करण्याचे स्वातंत्र्य असेल. तसेच मुलींना शाळेत जाण्याची परवानगी असेल.

तालिबानी प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिद याने महिलांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. जबीहुल्ला मुजाहिद याने महिलांच्या संरक्षणासाठी हे तात्पुरते धोरण असल्याचे म्हटले आहे. मुजाहिद म्हटला आहे की, आम्हाला चिंता आहे की आमच्या सैन्याला अद्याप फार चांगले प्रशिक्षण दिले गेले नाही. ते महिलांशी गैरवर्तन करू शकतो. आमचे सैन्य महिलांना इजा किंवा त्रास देऊ शकतात, म्हणून सध्या महिलांनी घरातच राहावे.