कुन्नुर हेलिकॉप्टर दुर्घटना प्रकरण – उड्डाण करताना व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलचे पालन झाले की नाही याची चौकशी करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱयांचा मृत्यू झाला, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे सदरच्या हेलिकॉप्टर उड्डाणावेळी व्हीव्हीआयपी प्रोटोकॉलचे पालन झाले की नाही याची सखोल चौकशी केली जाईल, निष्कर्षांवर आधारित सर्व बाजूची समीक्षा केली जाईल, असे हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

सीडीएस बिपीन रावत यांना घेऊन जाणाऱया हेलिकॉप्टर दुर्घटनेमागची नेमकी कारणे काय, त्याची चौकशी व्हावी अशी देशभरातून मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना आम्ही हेलिकॉप्टर दुर्घटनेची सर्व बाजूने चौकशी करत असल्याचे व्ही. आर. चौधरी यांनी सांगितले. तसेच पाकिस्तान आणि चीनकडून असलेल्या धोक्यांचेही आम्ही मूल्यांकन करत असून त्याबाबत अधिक जागृक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.