
अलीकडेच तामीळनाडूमधील रामेश्वरच्या समुद्रकिनारी एक फार मोठं कासव आढळून आले. कासवाचे वजन 100 किलो आहे. त्याचे वय 188 वर्षे असल्याचा अंदाज आहे. कासवाचे नाव गिनिज बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.
आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी कासवाचा फोटो ट्विटरवर शेअर करून या वयस्कर कासवाची माहिती दिली. जोनाथन असे कासवाला नाव ठेवण्यात आले आहे. त्याला पुन्हा समुद्रात सोडण्यात आले आहे.
रामनाथपूरम जिह्यातील मंडपम येथे सापडलेल्या या कासवाचा जन्म 1832 मध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. आतापर्यंत या कासवाने दोन्ही महायुद्ध पाहिली आहेत. रशियाची क्रांतीसुद्धा या कासवाने पाहिल्याचा अंदाज आहे.




























































