गंगा नदीत बुडता बुडता वाचली ‘ही’ अभिनेत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाराणसी

गंगा नदीत पोहण्याच्या दृष्याचे चित्रिकरण करणे एका प्रसिद्ध अभिनेत्रीला महागात पडले आहे. एका सतर्क स्पॉटबॉयमुळे ही अभिनेत्री बचावली आहे.

tamy

हॉलिवूड अभिनेत्री टॅमी बारतेआ ही सध्या दिग्दर्शक अतुल गर्ग यांच्या ‘द लेजेंड ऑफ पिकॉक’ या चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे सध्या वाराणसी येथे चित्रीकरण सुरू आहे. या चित्रिकरणादरम्यान टॅमीला गंगा नदीत पोहोतानाचा सीन शूट करायचा होता. मात्र सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे गंगा नदीचा प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे टॅमी नदीत बुडू लागली. दिग्दर्शक अतुल यांना हे लक्षात आले त्यानंतर एका स्पॉट बॉयने नदीत उडी घेत टॅमीला वाचवले.

‘द लेजेंड ऑफ पिकॉक’ हा चित्रपट हिंदी व इंग्लिश या दोन्ही भाषेत तयार केला जाणार आहे. या चित्रपटात हॉलिवूडमधील टॅमी बारतेआ, टिम ब्रूस हे दिसणार आहेत.