तान्हाजी अवतरला मराठमोळ्या ढंगात, पाहा मराठीतला टीझर

शूरवीर मराठा योद्धा तानाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप इतिहासावर आजही कायम असून लवकरच ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट मराठीत प्रदर्शित होणार आहे. त्याचा मराठी भाषेतला टीझरही प्रदर्शित झाला आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री काजोल झळकणार आहे. या खेरीज शरद केळकर, पद्मावती राव, सैफ अली खान, अजिंक्य देव, देवदत्त नागे हे कलाकारही यात विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या