
तारख मेहता का उल्टा या चष्मा या सुप्रसिद्ध हिंदी मालिकेतील एक कलाकार सोन साखळी चोर बनला होता. लाखो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी तो चोरी करायला लागला होता. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत.
मिराज कापरी हा मूळचा गुजरातचा रहिवासी आहे. त्याने तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमात छोटी भुमिका बजावली होती. तसेच थपकी प्यार की आणि मेरे अंगने मे या मालिकेतही छोट्या भुमिका बजावल्या होत्या. मिराजला सट्टा आणि जुगार खेळायचा नाद होता. सट्ट्यामध्ये तो 30 लाख रुपये हरला होता. म्हणून त्याने चोरी करण्यास सुरूवात केली.
मिराज शक्यतो निर्जन ठिकाणी महिलांना लक्ष्य करायचा. त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि मोबाईल चोरी करायचा. मिरज एका ठिकाणी आल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. तेव्हा सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. तेव्हा कर्ज मिटवण्यासाठी आपण चोरी करत होतो अशी कबुली मिराजने दिली. मिराजसोबत त्याचा साथीदार वैभव बाबू जादव यालाही अटक करण्यात आली आहे.





























































