तारिनी सुरीला दुहेरी मुकुट

जबर फॉर्मात असलेल्या अव्वल मानांकित तारिनी सुरी हिने अपेक्षेप्रमाणे सीसीसीआय-जीएमबीए बॅडमिंटन स्पर्धेत 17  आणि 19  वर्षांखालील मुली एकेरी गटाचे जेतेपद पटकावले. सीसीआय बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या स्पर्धेच्या 17  वर्षांखालील मुली गटात टॉप सीडेड तारिनीने दुसऱया मानांकित रिया विन्हेरकर याच्यावर 21-16, 21-18 असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. या फायनलनंतर 45 मिनिटांच्या फरकाने झालेल्या 19  वर्षांखालील गटाच्या अंतिम फेरीत तारिनीने सानवी मर्डोलकरवर एकतर्फी विजय मिळवला.