इस्लाम आहे तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही! तस्लिमा नसरीन

पहलगाम दहशतवादी हल्ला आणि 2016 मधील दहशतवादी हल्ला यांत साम्य असून इस्लाम जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दहशतवाद संपणार नाही, असे विधान बांगलादेशातील लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले आहे. इस्लामचा गेल्या 1400 वर्षात विकासच झालेला नसल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीतील साहित्य महोत्सवातील एका सत्रात त्या बोलत होत्या.

इस्लाम जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत तो दहशतवाद्यांना जन्म देत राहील. 2016 च्या ढाका हल्ल्यात मुस्लिमांना कलमा म्हणता येत नसल्याने त्यांची हत्या करण्यात आली. जेव्हा श्रद्धेला तर्क आणि मानवतेवर मात करण्याची परवानगी दिली जाते तेव्हा असेच घडते, असे त्या म्हणाल्या. 1 जुलै 2016 रोजी ढाक्यातील होली आर्टिसन बेकरीवर दहशतवाद्यांनी गोळीबार करून 29 जणांचा बळी घेतला होता. याची आठवण नसरीन यांनी करून दिली. दरम्यान, मी अमेरिकेची कायमची रहिवासी आहे. पण, मला तिथे आपलेपणा वाटत नाही. कोलकात्यात आल्यानंतर घरी असल्यासारखे वाटते, असेही त्या म्हणाल्या.

मुस्लिम सर्वत्र मशिदी बांधण्यात व्यस्त

युरोपातील चर्च संग्रहालयात रुपांतरित झाले आहेत. परंतु, मुस्लिम सर्वत्र मशिदी बांधण्यात व्यस्त आहेत. हजारो मशिदी आहेत आणि त्यांना आणखी मशिदी बांधायच्या आहेत. ते जिहादी निर्माण करतात. मदरसे नसावेत. उलट मुलांनी फक्त पुस्तके वाचली पाहिजेत, असेही नसरीन म्हणाल्या.