Tata च्या गाड्यांवर मिळतेय 70 हजारांपर्यंत सूट, जाणून घ्या कसा घ्याल लाभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानची आघाडीची कार निर्माता कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) च्या गाड्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांकडे चालून आली आहे. टाटाने आपल्या काही खास गाड्यांवर भरभक्कम सूट देण्याचा निर्णय घेतला असून यामुळे ग्राहकांना तब्बल 70 हजारांचा फायदा होऊ शकतो. कंपनीकडून सध्या Nexon, Tigor, Tiago आणि Harrier या गाड्यांवर सूट दिली जात आहे.

आज आपण टाटाच्या या चार गाड्यांपैकी कोणत्या गाडीवर किती सूट मिळत आहे हे जाणून घेणार आहोत. कंपनीची ही ऑफर मर्यादित काळासाठी असून वेगवेगळ्या राज्यात आणि डिलरशीपनुसार यात काही बदलही होऊ शकतो. चला तर याबाबत अधिक जाणून घेऊया…

Tata Tiago –

tata-tiago

टाटाच्या या शानदार गाडीवर एकूण 28 हजार रुपयांची सूट मिळत आहे. कंपनी यावर 15 हजार रुपयांची रोख सूट देत असून 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही देत आहे. तसेच कार्पोरेट कामगार या कारच्या खरेदीवर अधिक 3 हजार रुपयांची बचत करू शकतात.

Tata Tigor –

tata-tigor

टाटाची ही आणखी एक दमदार गाडी आहे. या गाडीच्या खरेदीवर ग्राहकांना 33 हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. टाटा कंपनी या गाडीवर 15 हजार रुपयांची रोख सूट देत असून 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही देतेय. तसचे 3 हजार रुपयांचा अतिरिक्त कार्पोरेट बोनसही तुम्हाला मिळू शकतो.

Tata Harrier –

tata-harrier

Tata Harrier मधील Camo, Dark Edition, XZ+ आणि XZA+ या व्हेरिएन्ट व्यतिरिक्त अन्य व्हेरिएन्टवर कंपनी एकूण 70 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. यात 25 हजार रुपयांची रोख सूट, 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांची कार्पोरेट बोनसचा समावेश आहे. तसेच Camo, Dark Edition, XZ+ आणि XZA+ या व्हेरिएन्टवर कंपनी एकूण 45 हजारांची सूट देत असून यात 40 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांचा कार्पोरेट बोनसचा समावेश आहे.

Tata Nexon –

tata-nexon

पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रीक असे तिन्ही पर्यात असणाऱ्या या गाडीवर कंपनी वेगवेगळी सूट देत आहे. डिझेल मॉडेलवर ग्राहकांना 20 हजारांपर्यंत सूट मिळत असून यात 15 हजारांचा एक्सचेंज बोनस आणि 5 हजारांचा कार्पोरेट बोनसचा समावेश आहे. पेट्रोल मॉडेलवर 3 हजार रुपयांची सूट आणि 3 हजार रुपयांचा कार्पोरेट बोनस मिळू शकतो, तर इलेक्ट्रीक कारमध्ये एकूण 15 हजारांची सूट मिळत असून यात 15 हजारांचा एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.