एअर इंडियाच्या पंखांना पुन्हा टाटांचे बळ, 69 वर्षांनंतर ‘महाराजा’ची घरवापसी; खासगीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोटय़वधींच्या कर्जामुळे केंद्रातील मोदी सरकारला डोईजड झालेल्या एअर इंडिया एअरलाइन्सचे स्टिअरिंग 69 वर्षांनंतर पुन्हा टाटा ग्रुपच्या हाती आले आहे. गुरुवारी ‘महाराजा’च्या टेकओव्हरची प्रक्रिया अधिकृतरीत्या पूर्ण झाली आणि या सरकारी कंपनीवर खासगी कंपनीचा शिक्का बसला. टाटा ग्रुपच्या टेलेस कंपनीला एअर इंडियाची 100 टक्के मालकी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (दीपम) ट्विटरवरून ही माहिती दिली.

एअर इंडियाचे खासगीकरण हा 1.2 लाख कोटींची उलाढाल असणाऱया हिंदुस्थानी हवाई उद्योगातील मोठा बदल ठरला आहे. एअर इंडियाच्या टेकओव्हरची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. कंपनीचा पूर्ण शेअर टेलेस प्रायक्हेट लिमिटेडकडे हस्तांतरित केला आहे, असे गुंतकणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिक तुहीन कांत पांडे यांनी ट्किटरकरून जाहीर केले. टेलेस कंपनीच्या नवीन बोर्डाने गुरुवारी एअर इंडियाची अधिकृत सूत्रे स्कीकारली. एअर इंडियाच्या लिलाव प्रक्रियेत टेलेसने ऑक्टोबर 2021 मध्ये बाजी मारली आणि ही कंपनी स्वत:कडे मिळवली आहे. कंपनीने गुरुवारी सरकारला अंतिम पेमेंट करून टेकओव्हर अधिकृतरित्या पूर्ण केले.

टाटा सन्सचे चेअरमन पंतप्रधान मोदींना भेटले

टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी गुरुवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्किटर हॅण्डलवरून दोघांच्या भेटीचा फोटो शेअर केला. या भेटीनंतर चंद्रशेखरन यांनी थेट नवी दिल्लीतील एअर इंडिया हाऊस गाठले. तेथे त्यांनी विमान कंपनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. याकेळी ‘दीपम’ आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते.

आनंद परतलाय!

आम्ही प्रचंड खूश आहोत. एअर इंडियाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमचा आनंद परतलाय. आम्ही ‘महाराजा’चे गतवैभव परत मिळवून देऊ. या विमान कंपनीला एक जागतिक दर्जाची एअरलाइन्स बनवण्यासाठी सर्कांशी मिळून काम करू. लवकरच नव्या बोर्डची घोषणा केली जाईल. – एन. चंद्रशेखरन, चेअरमन, टाटा ग्रुप

एअर इंडियाचा 90 वर्षांचा प्रवास

  • दिवंगत उद्योजक जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती.
  • दुसऱया जागतिक महायुद्धावेळी विमान सेवांवर बंदी घालण्यात आली होती. 29 जुलै 1946 रोजी विमान सेवा पुन्हा सुरू करण्यात आली, त्यावेळी टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया लिमिटेड असे ठेवण्यात आले.
  • 1947 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळताच सरकारने एअर इंडियातील 49 टक्के हिस्सेदारी खरेदी केली. त्यानंतर 1953 मध्ये या विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण झाले होते.
  • पुढच्या काळात कोटय़वधींच्या कर्जामुळे एअर इंडिया पूर्णत: डबघाईला आली. त्यामुळे देशाची शान असलेली ही कंपनी विकायची वेळ केंद्र सरकारकर आली. लिलाव प्रक्रियेत टाटा ग्रुपच्या टेलेस कंपनीने बोली जिंकली आणि 69 कर्षांनंतर एअर इंडियाने घरवापसी केली.