‘टाटा स्टील’मधील 3000 कर्मचाऱयांची नोकरी जाणार

651

मंदीचे चटके; मागणीत घट, उत्पादन खर्चात वाढ

आर्थिक मंदीचे चटके  ‘टाटा स्टील’च्या कर्मचाऱयांना बसत आहेत. टाटा स्टीलकडून युरोपातील सुमारे 3 हजार कर्मचाऱयांची कपात केली जाणार आहे. मागणीत घट आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ याचा फटका ‘टाटा स्टील’ला बसला आहे.

याबाबत टाटा स्टीलचे युरोपातील सीईओ होंनरिक एडम यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिले आहे. रॉयटर्सने याविषयी वृत्त दिले आहे. विक्रीत वाढ करणे, युरोपातील तीन हजार कर्मचाऱयांना नोकरीवरून काढणे आणि कामगिरीत सुधारणा करणे, अशा योजना कंपनीने केल्या आहेत. मागणीत घट, व्यापारी अडचणी आणि इतर समस्यांमुळे कर्मचारी कपात केली जात आहे. ज्या कर्मचाऱयांना नोकरीवरून काढले जाणार आहे त्यातील दोनतृतीयांश कर्मचारी कार्यालयात काम करणारे आहेत. मात्र, प्रकल्प बंद करण्यात येणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या