
राज्यात कोकणासह मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिह्यांना ‘तौकते’ चक्रीवादळाने प्रचंड तडाखा दिला होता. या चक्रीवादळग्रस्तांना मदतीची घोषणा राज्य सरकारने केली होती. त्यानुसार राज्याच्या महसूल व वन विभागाने वाढीव दराने मदत देण्याचे आदेश आज जारी केले आहेत. त्यामुळे तौकते चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तौकते चक्रीवादळग्रस्तांना वाढीव दराने मदत देण्याचा निर्णय मागील आठवडय़ात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार आज शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
मृतांच्या नातेवाईकांना मदत
चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 4 लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अतिरिक्त एक लाख रुपयांची मदत.
आर्थिक मदत पुढीलप्रमाणे
z नैसर्गिक आपत्तीत घर पूर्णपणे नष्ट झाले असल्यास घरगुती कपडे व वस्तूंसाठी प्रति कुटुंब पाच हजार रुपये.
z वादळात पत्रे, कौले उडून गेले असल्यास कपडे, घरगुती भांडी वस्तूंसाठी प्रति कुटुंब पाच हजार रु.
z पूर्णपणे नष्ट झालेल्या पक्क्या व कच्च्या घरांसाठी मदत- दीड लाख रु.
z अंशतः पडझड झालेल्या (किमान 15 टक्के) पक्क्या/कच्च्या घरांसाठी मदत 15 हजार रु.
z अंशतः पडझड झालेल्या (किमान 25 टक्के) पक्क्या- कच्च्या घरांसाठी 25 हजार रु.
z अंशतः पडझड झालेल्या (किमान 50 टक्के) पक्क्या -कच्च्या घरांसाठी 50 हजार रुपयांची मदत.
z नष्ट झालेल्या पात्र असलेल्या झोपडय़ांना 15 हजार रु. मदत.
z बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 50 हजार रु. मदत
z नारळाच्या प्रति झाडासाठी- 250 रु. z सुपारी झाडासाठी- 50 रुपये प्रति झाड (2 हेक्टरच्या मर्यादेत)
z दुकानदार व टपरीधारक- प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत मदत
z पूर्णपणे नष्ट झालेल्या बोटीसाठी 25 हजार रु.
z बोटीच्या अंशतः दुरुस्तीसाठी 10 हजार रु.
z नष्ट झालेल्या मासेमारी जाळीसाठी व अंशतः खराब झालेल्या जाळीसाठी 5 हजार रु.





























































