
देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो ही म्हण तंतोतंत खरी ठरलीय ती दुबईत टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करणाऱया हिंदुस्थानी वंशाच्या रंजीत सोमराजन यांच्या बाबतीत. सोमराजन यांनी तब्बल दोन कोटी दिरहमची म्हणजेच जवळपास 40 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. खलीज टाइम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.
37 वर्षीय सोमराजन हे मूळचे केरळचे. अबुधाबीत ते ड्रायव्हरची नोकरी करतात. एक ना एक दिवस आपले भाग्य उजळेल, या आशेवर गेल्या तीन वर्षांपासून ते नियमितपणे लॉटरीचे तिकीट खरेदी करतायत. अखेर त्यांचे नशीब उघडले आहे. आपला आनंद व्यक्त करताना रंजित म्हणाले, 2008पासून मी अबुधाबीत आहे. दुबई टॅक्सी आणि विविध कंपन्यांमध्ये मी ड्रायव्हर आहे. गेल्या वर्षभरापासून एका पंपनीत ड्रायव्हर कम सेल्समन म्हणून काम करतोय. पगार कपातीमुळे आयुष्यातील समस्या वाढल्या होत्या. आता जॅकपॉट जिंकल्याने मी आनंदी आहे. या बक्षिसात नऊ जणांचा वाटा असून ते वेगवेगळ्या देशांतील असल्याचे त्याने सांगितले आहे.


























































