पुणे : ‘अमृततुल्य’चे बॉक्स घेऊन फरार, चोरटा सहा वर्षांनतर अटकेत

682

कात्रज चौकात पार्क केलेल्या ट्रकमधून नामांकित चहाच्या कंपनीचे 8 लाखांचे बॉक्स चोरट्याने चोरून नेले होते. त्यानंतर पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. अखेर सहा वर्षांनतर त्याला अटक करण्यात आले आहे.

राजू कुशलराम चौधरी (वय 28, रा. उरूळी कांचन ) असे अटक केलेल्याचे  नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमधील चहाचे बॉक्स चोरणारा फरारी आरोपी राजू चौधरी मार्केट यार्डात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक भूषण कोते, गणेश चिंचकर, अभिजीत जाधव, महेश मंडलीक, अभिजीत रत्नपारखी, कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सचिन पवार, राहूल तांबे, सर्फराज देशमुख यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या