सेमी फायनलमध्ये पराभवानंतर दोघांनी टीम इंडियाची साथ सोडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडकडून हिंदुस्थानला 18 धावांनी धक्कादायक पराभव सहन करावा लागला. अनपेक्षीत पराभवामुळे देशवासियांसह टीम इंडियाचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफही भावूक झाला आहे. याच दरम्यान टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांनी राजीनामा दिला आहे. टीम इंडियाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ड आणि फिटनेस कोच शंकर बास यांनी आपला राजीनामा बीसीसीआयला पाठवला आहे.

वर्ल्डकपमध्ये लिग स्टेजला टीम इंडियाने क्षेत्ररक्षणात चांगलाच जोर लावला होता. यात फिजिओ फरहार्ट आणि फिटनेस कोच शंकर यांचे मोठे योगदान होते. आता या दोघांनीही राजीनामा दिला आहे. फिजिओ फरहार्ट यांचा करार विश्वचषकाच्या अखेरीच संपणार होता. बीसीसीआयने हा करार वाढवण्याची देखील तयारी दाखवली होती, परंतु दोघांनीही नकार दिला.

फिजिओ फरहार्ट यांनी ट्वीट करून आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. हिंदुस्थानी संघासोबत आज माझा शेवटचा दिवस होता. अपेक्षेप्रमाणे आपण प्रदर्शन करू शकलो नाही. टीम इंडियासोबत 4 वर्ष काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानतो. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

patrick