
न्यूझीलंडमध्ये खेळवल्या जाणाऱया महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या टीम इंडियाला आज दिलासा लाभला आहे. दोन दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सर्व लढतीत डोक्यावर बाउन्सर आदळून जायबंदी झालेली धडाकेबाज डावखुरी फलंदाज स्मृती मंधाना आता पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी फिट असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन चिंतेतून बाहेर आले आहे. सुदैवाने हेल्मेटवर आदळलेल्या चेंडूंमुळे स्मृतीला गंभीर दुखापतन झाल्याने हि कन्क्शनची केस ठरली नाही.
पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानला 6 मार्चला सलामीच्या लढतीत खेळायचे आहे. सर्व लढतीत सलामीला आलेल्या स्मृती मंधानाने 12 धावाच नोंदवल्या असताना दक्षिण आफ्रिकन वेगवान गोलंदाजांचा उसळता बाउन्सर तिच्या हेल्मेटवर जोराने आदळला होता.त्यानंतर दक्षतेचा उपाय म्हणून तिला मैनातून रिटायर्ड हर्ट म्हणून तंबूत परत पाठवण्यात आले होते. आज डॉक्टरांनी स्मृतीच्या दुखापतीची बारकाईने पाहणी करीत तिला पुन्हा मैदानात खेळण्याची परवानगी दिली. 25 वर्षीय स्मृती हिंदुस्थानी डावाला आकार देणारी प्रमुख फलंदाज मानली जाते. त्यामुळे तिचे खेळणे टीम इंडियाला लाभदायक ठरणार आहे.
स्मृतीची वन डेत कामगिरी
लढती 64
सरासरी 41.71
धावा 2461

























































