
सामना ऑनलाईन । मुंबई
अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या पु. ल. देशपांडे यांच्यावर आधारित भाई- व्यक्ती की वल्ली हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. प्रदर्शित झालेला भाग हा चित्रपटाचा पूर्वार्ध असून त्याच्या उत्तरार्धाचा टीझरही प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये पुलंच्या मिश्कील आणि तिरकस विनोदांची पखरण पाहायला मिळत आहे. रेडिओ आकाशवाणी तर टीव्ही प्रकाशवाणी का नाही? असं पंडित नेहरूंना विचारणारे पुलं या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत.
भाई…च्या पूर्वार्धाप्रमाणेच अनेक नामवंत चेहरे उत्तरार्धातही पाहायला मिळणार आहेत. त्याची झलकही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई- व्यक्ती की वल्ली या चित्रपटाचा उत्तरार्ध 8 फेब्रुवारी 2019 रोजी प्रदर्शित होत आहे.
पाहा टीझर-



























































