
सामना ऑनलाईन । मुंबई
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यातच पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. सांताक्रूझ रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अप मार्गावरील लोकल विलंबाने धावत आहेत. या बिघाडामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर झाला असून या लोकल 10 ते 15 मिनिटे उशीराने धावत आहेत.
Western Railway: Today on 07.07.2019 due to technical problem at Santacruz, all up local is running 10-15 minutes late. Inconvenience caused to passengers is deeply regretted. #Mumbai pic.twitter.com/UbF68WvM0p
— ANI (@ANI) July 7, 2019
























































