स्मार्टफोनला आग लागण्याची ‘ही’ आहेत कारणं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या महिन्याभरापासून स्मार्टफोनला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच इंडिगोच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाच्या स्मार्टफोनला आग लागली होती. आज आपण स्मार्टफोनला आग लागण्याची कारणं जाणून घेऊया.

आपल्या स्मार्टफोन थेट उन्हात ठेवणे हानिकारक आहे. हे एक महत्वाचे कारण आहे की स्मार्टफोनची बॅटरी आग पकडते. त्यामुळे स्मार्टफोम ठेवताना गरम असलेल्या ठिकाणी ठेवू नका. ते धोकादायक ठरु शकतं.

अनेकांना रात्री झोपताना फोन चार्ज करायला ठेवायची सवय असते. रात्रभर फोन चार्जिंगला लावल्यामुळे फोनची बॅटरी गरजेपेक्षा जास्त गरम होऊ शकते आणि त्यामुळेही फोनला आग लागू शकते.

स्मार्टफोन सांभाळून हाताळणं गरजेचे असते. जर तुमच्या हातातून स्मार्टफोम सारखा पडत असेल. तर भले त्यावेळी फोनला काही झाले नसले तरी बॅटरीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग अचानक फोनला आग लागण्यासारखे प्रकार घडू शकतात.

स्मार्टफोन्स एकावेळी अनेक कामं करु शकतात. मात्र गेमिंग आणि मल्टी टास्कींगमुळे फोनचे प्रोसेसर लवकर गरम होते. त्यामुळे आग लागू शकते. जसं माणसांना आरामाची गरज असते तसे स्मार्टफोनलाही आरामाची गरज असते.

स्मार्टफोनला चार्ज करताना केवळ कंपनीचे ब्रॅण्डेड चार्जरच वापरावे. थर्ड पार्टी चार्जर किंवा कोणतेही लॉकर चार्चर ने चार्ज केल्याने बॅटरी लवकर खराब होऊ शकते. त्यामुळे फोनला आगही लागू शकते.