
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलॉन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरचा ट्विटरसोबत केलेला करार रद्द करण्याचा इशारा दिला आहे. कंपनी बनावट युजर्सच्या खात्यांचा डेटा लपवत आहे. योग्य डेटा उपलब्ध करून न दिल्यास करार रद्द केला जाईल, असा इशारा मस्क यांनी सोमवारी ट्विटरला पत्राद्वारे दिला आहे. पत्रानुसार, ट्विटर विलीनीकरण कराराअंतर्गत कंपनी त्यांच्या जबाबदाऱयांचे पालन करण्यास, पारदर्शकपणे काम करण्यास नकार देत आहे.



























































