
केज तालुक्यातील माळेगांव येथील रोहन भगवान गव्हाने या होतकरू विद्यार्थ्याने दुष्काळामुळे आत्महत्या केली आहे. शाळा-कॉलेज सुरू होऊन दोन महिने उलटले तरीही पैशाअभावी बारावीला प्रवेश घेणे शक्य होत नसल्याने रोहनने शुक्रवारी रात्री दरम्यान विषारी विष प्राशन करून आत्महत्या केली.
घरच्या एकरभर शेतातील या भयानक दुष्काळाने पिकसुद्धा करपलं, तर आई-वडील मोलमजुरी करून गुजराण करतात. रोहनचा लहान भाऊ शिक्षणासाठी लातूरला असतो. त्याचा शिक्षणाचा खर्च जाऊन रोजंदारीवर घर कसंबसं चालतं. मग अशा बिकट परिस्थितीत घरी शैक्षणिक शुल्क भरण्याकरता पैसे कसे मागायचे ? या विचाराने शेवटी आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलणाऱ्या रोहनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.



























































