TPL 2025 – हिंदुस्थानचा श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्लीवर लागली सर्वाधिक बोली

टेनिस प्रीमियर लीगच्या सातव्या हंगामाचा लिलाव नुकताच मुंबई पार पडला. लिएंडर पेस, महेश भूपती आणि सानिया मिर्झा या दिग्गज टेनिसपटूंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या लिलावात हिंदुस्थानचा श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्लीवर लागली सर्वाधिक बोली लागली. गुरगाव ग्रँड स्लॅमर्सने श्रीराम बालाजीसाठी 12 लाख, तर चेन्नई स्मॅशर्सने ऋत्विक बोल्लीपल्ली याला 12 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतले. हे दोघेही या लिलावातील सर्वाधिक बोलीचे खेळाडू ठरले. यंदाचा हंगामातील लीग टप्पा 9 ते 14 डिसेंबर दरम्यान गुजरात युनिव्हर्सिटी टेनिस स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाणार आहे.

इतर खेळाडूंवर लागलेली बोली

श्रिवल्ली भामिडीपती – 8.6 लाख, एसजी पायपर्स बंगळुरू
रामकुमार रामनाथन – 7.2 लाख, एसजी पायपर्स बंगळुरू
कॅरोल मॉनेट – 10.6 लाख, हैदराबाद स्ट्रायकर्स
विष्णू वर्धन – 6 लाख, हैदराबाद स्ट्रायकर्स
सोफिया कॉस्टूलस – 11 लाख, दिल्ली एसेस
जीवन नेदुंचेझियान – 6 लाख, दिल्ली एसेस
नुरिया ब्रांकाचियो – 10 लाख, गुजरात पँथर्स
अनिरुद्ध चंद्रशेखर – 7 लाख, गुजरात पँथर्स
धक्षिणेश्वर सुरेश – 7.5 लाख, राजस्थान रेंजर्स
अनास्तासिया गासानोवा – 6 लाख, राजस्थान रेंजर्स
निक्की पुनाचा – 6 लाख, यश मुंबई ईगल्स
मरियम बोल्कवद्झे – 6 लाख, यश मुंबई ईगल्स