ट्रेंड – अजगराची जांभई

सापाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. त्यात अजगर असेल तर भीती अजगराच्या देहाएवढीच वाढते. मग तो समोर असो की स्क्रीनवर. सोशल मीडियावर सध्या एका अजगराचा असाच धडकी भरवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात हा अजगर जांभई देताना दिसत आहे. ही जांभई प्रचंड भीतिदायक आहे. जांभई देताना अजगराने उघडलेला जबडा पाहिला की, आपणच त्यात खेचलो जातोय की काय असा भास होतो. या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. @lauraisabelaleon या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ तुम्हालाही पाहता येईल.