अरुणाचल प्रदेशमध्ये बंडखोरांचा सैनिकांवर हल्ला, एक जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अरुणाचल प्रदेशमध्ये काही बंडखोरांनी हिंदुस्थानी सैन्यावर हल्ला केला, यात एक जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हेटलोंग गावाजवळ आसाम रायफलचे जवान पिण्याचे पाणी जमा करत होते. तेव्हा नॅशनल सोशालिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडच्या 30 दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला तसेच आयईडी स्फोटही केला. त्यात के जवान शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.