उरीमध्ये दहशतवाद्यांचा डाव उधळला

235

जम्मू-कश्मीरमधील कलम 370 हटवल्याच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी हिंसाचार घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हिंदुस्थानच्या जवानांनी मंगळवारी रात्री हाणून पाडला. पाकड्या दहशतवाद्यांनी उरी सेक्टरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र डोळ्यात तेल घालून पहारा देत असलेल्या हिंदुस्थानी जवानांनी पाकड्यांच्या घुसखोरीचा मनसुबा उधळून लावला. जम्मू-कश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. गेले काही दिवस हिंदुस्थानला नाना प्रकारच्या धमक्या देणार्‍या पाकिस्तानने स्वातंत्र्यदिनी हिंसाचार घडवण्याचा कट रचला होता.

आपली प्रतिक्रिया द्या