मेरिललाची कोविड-19 सेल्फ-टेस्ट कोविफाइंडसाठी आयसीएमआरची मंजुरी प्राप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

• ही 15 मिनिटांत झटपट निदान करणारी एक साधी, कमी इन्वेसिव, नेजल स्वॅबवर आधारित चाचणी, मेरिलच्या ‘कोविफाइंड’ या मोबाइल अॅपवर तपशीलवार मार्गदर्शन उपलब्ध
• मध्यम ते उच्च व्हायरल लोडचे निदान करणारी अत्यंत प्रभावी चाचणी
• हिंदुस्थानातात कोविड-१९ चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची वाढती मागणी कोविफाइंड पूर्ण करते, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी तसेच लॅब-टेस्टिंग संरचनेवरील ताण कमी करण्यासाठी एक सहज उपलब्ध होण्याजोगा व परवडण्याजोगा पर्याय
• प्रतिचाचणी किंमत २५० रुपये, हे साधन दोन आठवड्यांत थेट ऑर्डर्स घेण्यासाठीच्या डेडिकेटेड वेबसाइटमार्फत भारतभरातील फार्मसींमध्ये, ऑनलाइन फार्मसींमध्ये, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होईल

आपल्या कोविड-19चे निदान करणाऱ्या सेल्फ-यूज रॅपिड अँटिजेन टेस्टला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरी दिली आहे, अशी घोषणा गुजरातमधील वापी येथील जागतिक मेडटेक कंपनी मेरिलने आज केली. एतद्देशीय संशोधन व विकासातून तयार करण्यात आलेली ही चाचणी प्रादुर्भावित व्यक्तीमधील सार्स-सीओव्ही-टू विषाणूचे निदान खात्रीशीररित्या करू शकते आणि कोविड-19 आजाराची लक्षणे दाखवणाऱ्या व्यक्तींच्या तसेच कोरोनाची लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या चाचणीसाठी आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार वापरली जाऊ शकते. मेरिलची घरी करण्याजोगी रॅपिड अँटिजेन चाचणी देशातील कोविड-19 तपासणीची व्याप्ती वाढवण्यात मदत करेल. त्याचप्रमाणे कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी तपासणी व तिची वारंवारता वाढवण्याच्या राष्ट्राच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. उच्च दर्जाच्या रॅपिड अँटिजेन टेस्टिंगची तरतूद झाल्यास यापूर्वी व्याप्तीबाहेर असलेल्या तसेच साधनांची सुसज्जता नसलेल्या भागांमध्येही चाचण्या करणे शक्य होईल.

मध्यम ते तीव्र व्हायरल लोड असलेल्या व्यक्तींमधील प्रादुर्भावाचे निदान करण्यासाठी घरच्या घरी स्वत: तपासणी करण्याची सुविधा देणारी कोविफाइंड चाचणी खूपच प्रभावी आहे. मध्यम ते तीव्र व्हायरल लोड असलेल्या व्यक्तींकडून हा आजार दुसऱ्यांकडे संक्रमित होण्याची शक्यता खूप अधिक असते. प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींचे विलगीकरण, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती शोधून काढणे व गरज असल्यास त्यांच्यावर उपचार करणे या सगळ्यासाठी त्वरित निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या चाचणीचा निकालही झटपट येतो. केवळ १५ मिनिटांत ही चाचणी अचूक निदान करते. याशिवाय या चाचणीची साधने विशिष्ट पद्धतीने साठवण्याची किंवा रेफ्रिजरेट करण्याचीही गरज नाही. त्यामुळे तिचे वितरण सोपे व सोयीस्कर आहे.

चाचणी साधनाची किंमत २५० रुपये आहे आणि ती परवडण्याजोग्या सिंगल पॅकमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय ३, ५ आणि २५ टेस्ट किट्सचे अतिरिक्त खरेदी पर्यायही उपलब्ध आहेत. प्रत्येक टेस्ट किटमध्ये चाचणीचे साहित्य आहे. यात एक चाचणी उपकरण, एक निर्जंतुक नेजल स्वॅब आणि एक पूर्वीच भरलेली बफर ट्युब व कॅप असे साहित्य आहे. यासाठी कोणत्याही अतिरिक्त उपकरणाची गरज नाही. किटमध्ये वापराच्या सूचनांचे (आयएफयू) पत्रक असेल. त्यात प्रशासन प्रक्रियेची प्रत्येक पायरी तपशीलवार दिलेली असेल, टेस्ट किटची हाताळणी व विल्हेवाट यांबद्दलही माहिती या पत्रकात दिलेली असेल. याशिवाय एक डिसपोजेबल बॅग असेल. टेस्ट किट वापरल्यानंतर नेजल स्वॅब दिलेल्या लिसिस बफर नळीत इन्सर्ट करावा लागेल. यामध्ये सार्स-सीओव्ही-टू आणि अन्य विषाणू निष्क्रिय केले जातात. त्यानंतर नळी व चाचणीचे अन्य साहित्य दिलेल्या डिसपोजेबल बॅगमध्ये ठेवायचे. सुरक्षित विल्हेवाटीसाठी आवश्यक असलेली उच्चस्तरीय बायोकंटेन्मेंट या बॅगमुळे होईल.

नेजल स्वॅबमुळे चाचणीसाठी कमी इन्वेजिव पर्याय मिळतो. नमुन्याचे संकलन झटपट व सोयीस्कर होते. तसेच रुग्णाला होणारा त्रास कमी होतो व त्यामुळे चाचणी करवून घेण्याची तयारी वाढते. नेजल स्वॅब रुग्णाच्या नाकात २ ते ४ सेंटीमीटरपर्यंतच खोचावा लागतो. नेजोफॅरिंजिअल स्वॅब प्रौढांच्या नेजोफॅरिक्समध्ये अर्थात घशाच्या वरील भागात ८ ते १० सेंटीमीटरपर्यंत घुसवावा लागतो. त्या तुलनेत या चाचणीतील नेजल स्वॅब वापरणे सोपे आहे.

स्वयंवापराचे टेस्ट किट ‘कोविफाइंड अॅप’ या कंपनीच्या अधिकृत होम टेस्टिंग मोबाइल अॅप्लिकेशनच्या जोडीने वापरणे अपेक्षित आहे. हे उत्पादन बाजारात आल्यानंतर अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होईल. हे यूजर-फ्रेण्डली अॅप रुग्णाची सर्व ओळखपत्रे व तपशील संकलित करते, लक्षणे निश्चित करते आणि गायडेड किंवा झटपट चाचणी प्रशासनाचे पर्याय देऊ करते. गायडेड टेस्टमध्ये या प्रक्रियेचा प्रत्येक पायरीनुसार व्हिडिओ ब्रेकडाउन दिला जातो.

वापरकर्त्यांनी टेस्ट स्ट्रिपचा फोटो काढून ठेवावा, म्हणजे त्या आधारावर अॅप झटकन चाचणीच्या निष्पत्तीबाबत माहिती पुरवू शकेल आणि चूक होण्यास किंवा अर्थ लावण्यास जागा उरणार नाही. एआयवर आधारित असलेले हे अॅप पॉझिटिव व निगेटिव निकालांमध्ये सहज फरक करू शकते तसेच पॉझिटिव रुग्णांमधील आजाराची तीव्रताही ओळखते. मानवी डोळ्यांना ही तीव्रता अचूकतेने बघणे अनेकदा शक्य होत नाही. मग चाचणीचे निकाल सांगितले जातात. भूतकाळातील निकाल या अॅपमार्फत सहज बघता येतात. यातील डेटा डॉक्टरांसोबत शेअर करण्याचा पर्यायही रुग्णांना असतो.

ही रॅपिड अँटिजेन चाचणी देशातील ग्रामीण, निमशहरी व शहरी भागांत उपलब्ध करून देण्यासाठी मेरिल विस्तृत वितरण धोरणाचा अवलंब करत आहे. यांमध्ये प्रयोगशाळा चाचणीचे पर्यायत मर्यादित असलेल्या भागांचाही समावेश आहे. आरोग्यसेवा व्यावसायिकाच्या अनुपस्थितीत केल्या जाऊ शकतील आणि ओव्हर-द-काउंटर (प्रिस्क्रिप्शनशिवाय) उपलब्ध असतील अशा सेल्फ-यूज रॅपिड अँटिजेन चाचण्या सार्वजनिक आरोग्याच्या तपासणीच्या धोरणाच्या तसेच नियमित तपासणीच्या केंद्रस्थानी आहेत. न्याय्य आणि किफायतशीर चाचण्यांमुळे कार्यस्थळांवर, शाळांमध्ये आणि अन्य संस्थांमध्ये वारंवार चाचण्या करून घेणे सुलभ होईल. लोकांनी सामान्य व्यवहारांना सुरुवात केल्यानंतर ही बाब अधिक महत्त्वपूर्ण आणि आवश्यक ठरणार आहे.