ठाणे महापालिका मुख्यालयात, सॅनिटायझर टनेल

418

कोरोना विरुद्ध लढण्यासाठी महानगरपालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. पालिका मुख्यालयात प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर टनेल बसवण्यात आला असून त्यामुळे सहा सेकंदामध्ये निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांसह अधिकारी व कर्मचारी यांना यामुळे कोणत्याही व्हायरसची बाधा होऊ शकणार नाही.

कोरोनाविरोधात लढण्यासाठी बोरोप्लास्ष्ट या कंपनीने बॉडी निर्जंतुकीकरण यंत्र तयार केले आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने हे मशीन प्रायोगिक तत्त्वावर मुख्यालय येथे उभारण्यात आले आहे.
कोरोनाच्या या अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना तसेच येणाऱ्या नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये  म्हणून महापालिका प्रशासन युद्ध पातळीवर उपाययोजना करत असून या उपाययोजनेतर्गतच खबरदारी म्हणून हे निर्जंतुकीकरण मशीन उभारण्यात आले आहे.

या अत्याधुनिक मशीनमध्ये 500 लिटर पाण्याची टाकी लावून त्यामध्येपॉलिमेरिक बेक्यूनाइड हैड्रोक्लोराईडचे 0.5 टक्के हे प्रमाण वापरून निर्जंतुकीकरण करण्यात येते.या अत्याधुनिक निर्जंतुकीकरण मशीनमध्येव्यक्तीने प्रवेश केल्यानंतर सेन्सर कार्यान्वित होऊन स्प्रे सुरू होतो.10सेकंदांमध्ये संपूर्ण शरीरावर सॅनिटाझर स्प्रे होऊन व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत संपूर्ण शरीर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या