
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन महिला कर्मचाऱ्यांना लाच – स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदार यांच्याकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोनल नाडकर (२८) व संजना धाडवे (२९) या दोन महिला कर्मचारी सापळ्यात अडकल्या.
–
श्रेयस म्हात्रे यांची स्वतःच्या नावाची शासन नोंदणीकृत संस्था असून यातील तक्रारदार त्यांच्या परिचयाचे आहेत. म्हात्रे यांना अलिबाग या ठिकाणी खाडीलगत रॅम्प लावण्याचे कंत्राट मिळाले होते. त्यानुसार तक्रारदार यांनी काम चालू केले होते. त्याकरिता ऑनलाइन पद्धतीने लागणारी शासकीय फी भरली होती. याप्रकरणी सोनल नाडकर यांनी अहवाल देण्याकरिता शासकीय फीव्यतिरिक्त स्वतः साठी व वरिष्ठांसाठी लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान, तडजोडीअंती सोनल नाडकर व संजना धाडवे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.