ठाणे, रायगडात पावसाची तुफान बॅटिंग

मंगळवारी रात्री उशिरापासून सुरू झालेली पावसाची तुफान बॅटिंग आज दिवसभर ठाणे व रायगड जिल्ह्यात सुरू होती. या पावसामुळे एकच दैना उडवली. सखल भागात पाणी साचले. तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. या पावसामुळे वाहतुकीची पुरती वाट लागली. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

ठाणे शहरात आठ तासात 14.96 मिलिमीटर पाऊस पडला. आनंदपार्क, कोपरी, वागळे इस्टेट येथे झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. आतापर्यंत एकूण 4 हजार 319 मिलिमीटर पाऊस झाला. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागातही तुफान पाऊस झाला असून पालघर जिल्ह्यातही काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला.

कोकण भवन, सिडको मुख्यालयात पाणी
सीबीडी, बेलापूर येथील कोकण भवन आणि सिडको मुख्यालयाच्या मारतीमध्ये पाणी शिरले. त्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. सर्वाधिक पाऊस नेरूळ आणि बेलापूर परिसरात कोसळला.

उरणला झोडपले
मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. उरण शहर आणि परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले. तर जाहीर, रांजणपाडा, चिर्ले नवघर आदी गावातील घरात पाणी साचले होते. वहाळ येथील रस्त्यांवर पुरजन्य परिाqस्थती निर्माण झाली होती. गव्हाण फाटा ते उरण फाटा दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी झाली होती.

बेलापूर तुंबले
बेलापूरसह नवी मुंबईच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, सानपाडा जुईनगर, ऐरोली या परिसरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

पेण, रोहा, पनवेलमध्ये जनजीवन विस्कळीत
पनवेल, माथेरान, उरण, पेण, रोहा, तळा, श्रीवर्धन तालुक्यांना पावसाचा तडाखा बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पनवेल 24 तासात तब्बल 306 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

आपली प्रतिक्रिया द्या