
ओडिशाच्या पुरी समुद्रकिनारी 13 वा आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात देश-विदेशातील अनेक वाळू शिल्प कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांनी वाळूच्या सुंदर कलाकृती साकारल्या आहेत. त्या
पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये महोत्सवासाठी केलेली जोरदार तयारी दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धकासाठी खास जागा तयार करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर आतापर्यंतच्या वाळू महोत्सवाचे पह्टो दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी खुर्ची-टेबलची सोयसुद्धा करण्यात आली आहे. वाळू महोत्सवात एपंदरीतच 118 कलाकार सहभागी झाले आहेत. ओडिशाच्या पर्यटन विभागाने ओडिशा संगीत नाटक अकादमी आणि ओडिशा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मदतीने महोत्सव भरवला असून तो 5 डिसेंबरपर्यंत सुरू राहील.




























































