आचारसंहितेआधी घोषणांचा पाऊस, पाच दिवसांत तिसरी कॅबिनेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यासाठी शनिवारी सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली आहे. या आठवडय़ातील ही तिसरी मंत्रिमंडळ बैठक आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाची शनिवारी दुपारी तीन वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषद होत आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे शिंदे सरकारने आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने 33 निर्णयांना मान्यता दिली. त्यानंतर बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 26 निर्णयांना मान्यता दिली गेली. आगामी निवडणुका लक्षात घेता आजच्या बैठकीत जम्बो निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात मुंबईसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.