
सामना प्रतिनिधी । पुणे
राज्यात तसेच शहरात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी मध्यंतरी पावसाने चांगलीच ओढ दिली. त्यामुळे धरणांमधील पाणीपातळी खालावली आहे. सध्या पुणे शहराला पाणीपुरवठा करणाNया खडकवासला धरणात केवळ १४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर आणि वरसगाव धरणांच्या दुरुस्तीची कामे सुरू असल्याने ही दोन्ही धरणे रिकामी करण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या काळात पानशेतमध्ये असलेल्या सुमारे २.७२ टीएमसी पाण्यावरच पुणेकर आणि जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागणार असल्याचे चित्र आहे.
जून महिना शेवटच्या टप्प्यात आला असला, तरी अद्यापि पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याचे नियोजन बिघडले आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाNया चार धरणांपैकी दोन धरणांमध्ये शून्य टक्के पाणी आहे. खडकवासला धरणात सुमारे १४ टक्के, तर पानशेत धरणात सुमारे २५ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणाNया पवना धरणाच्या पाणीसाठ्याचीही स्थिती अन्य धरणांप्रमाणेच आहे. या धरणात सध्या १.७८ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी भामा आसखेड धरणात सुमारे २.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, अन्य धरणांतील पाण्याची पातळी तळाला गेली आहे. आंद्रा धरणात १.५८ टीएमसी, भाटघर धरणात १.४५ टीएमसी, येडगाव धरणात १.४५ टीएमसी आणि वीर धरणात १.४३ टीएमसी पाणीसाठा आहे. ही धरणे वगळता अन्य धरणांमध्ये एक टीएमसीपेक्षा कमी साठा असल्याचे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठाही संपला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
धरण आणि उपयुक्त
पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
माणिकडोह – ०.५१ येडगाव – १.४५
वडज – ०.१० डिंभे – ०.४४
कळमोडी – ०.१९ चासकमान – ०.५३
भामा आसखेड – २.४४ वडिवळे – ०.३६
आंद्रा – १.५८ पवना – १.७८
कासारसाई – ०.१२ टेमघर – ००
वरसगाव – ०० पानशेत – २.७२
खडकवासला – ०.२८ गुंजवणी – ०.७२
नीरा देवधर – ०.३६ भाटघर – १.४५
वीर – १.४३ उजनी – (-१०.४७)

































































