अर्थवृत्त- अखेरच्या दिवशी शेअर बाजार उसळला!

या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी शेअर बाजार उसळला. हिंदुस्थानी शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 447 अंकांनी वधारून 85,712 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 151 अंकांनी वाढून 26,186 अंकांवर बंद झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्के कपात केल्याचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसला. आयटी, रियल्टी, बँकिंग आणि मेटल सेक्टरच्या शेअर्समध्ये सर्वात मोठी वाढ पाहायला मिळाली. शेअर बाजार वाढीमागे काही प्रमुख कारणे ठरली. यामध्ये रेपो रेटमध्ये कपात हे प्रमुख कारण ठरले. आरबीआयच्या या निर्णयामुळे बँकिंग, रियल इस्टेट पंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदीदारी वाढली. बँकिंग, एबीएफसी आणि रियल इस्टेट पंपन्यांच्या व पीएसयू बँक इंडेक्स दोन्हींमध्ये वाढ दिसली. रेपो रेटच्या कपातीसोबत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली.

गुंतवणूकदारांनी कमावले 95 हजार कोटी  

शेअर बाजार उसळल्याने शुक्रवारी बीएसईमध्ये लिस्टेड पंपन्यांचे एकूण मार्पेट पॅपिटलायझेशन वाढून 470.80 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गुरुवारी हे 469.85 लाख कोटी रुपये होते. याचप्रमाणे बीएसई लिस्टेड पंपन्यांचे मार्पेट पॅप वाढल्याने गुंतवणूकदारांनी 95 हजार कोटी रुपयांची कमाई केली.

डिफाइनेजचा निधी

डिफाइनेज सिक्युरिटीज ब्रोकिंग प्रायव्हेट लि. या फिनटेक व ब्रोकरेज पंपनीला संस्थात्मक एंजल गुंतवणूक फेरीतील पहिला निधी प्राप्त झाला आहे. या पथकाचे नेतृत्व या उद्योगातील ज्येष्ठ तज्ञांनी एंजल गुंतवणूकदारांनी केले.

टाटा म्युच्युअल फंड

नेटवर्क पीपल सर्व्हिस टेक्नोलॉजीज लि.ने टाटा म्युच्युअल फंडद्वारे संपूर्ण सदस्यता घेण्यात आलेल्या प्रिफरेन्शियल इश्युच्या माध्यमातून 300 कोटींहून अधिक निधी यशस्वीपणे उभारल्याची घोषणा केली.

रोजगार निर्मितीत घट

जॉब साईट इन्डीडच्या ताज्या डेटानुसार ऑक्टोबर महिन्यात रोजगार निर्मिती कमी झाली असून प्लॅटफॉर्मवरील नोकरी पोस्टिंगमध्ये महिन्यागणिक 5.6 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत पोस्टिंग्स 19.8 टक्क्यांनी कमी राहिली आहे.

सामंजस्य करार 

महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट 2026 साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या वेळी डॉ. पी. अनबलगन, सहअधिकारी समीर जैन, महावीर प्रताप शर्मा उपस्थित होते.

1100 घरे विक्रीचा राष्ट्रीय विक्रम  

रियल इस्टेट क्षेत्रात पुण्यातील क्रिसाला हिरानंदानी टाऊनशिपमध्ये केवळ एका दिवसात 1,100 पेक्षा जास्त घरांचे बुकिंग झाले आहे. यामुळे तब्बल 1,000 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या राष्ट्रीय विक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरासह महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्राला नवीन कलाटणी मिळणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील घरांचे वाटप करण्यात आले असून आता दुसऱया टप्प्यातील घर वाटप लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

एचपी लेजर एम-300चा विस्तार 

 कॉम्प्युटर हार्डवेअर बनवणारी पंपनी एचपी इंडियाने लेजर एम 300 सीरिजचा विस्तार केला आहे. याअंतर्गत पंपनीने नवीन मॉडेल आणले आहे. या मॉडलमध्ये लेसर 303डी (13,999 रुपये), लेसर 303डीडब्ल्यू (15999 रुपये), एमएफपी 323डी (19499 रुपये), एमएफपी 323डीएनडब्ल्यू (22,499 रुपये) आणि एमएफपी 323एसडीएनडब्ल्यू (25499 रुपये) असे पर्याय उपलब्ध आहेत. ऑटो-डुप्लेक्स प्रिंटिंग कागदाचा वापर कमी करण्यास मदत करते आणि जास्त उत्पादन देणारे टोनर ऑपरेटिंग खर्च कमी करतात.

ऑम्नीसायन्स पॅपिटलची पीएमएस सेवा सुरू

ऑम्नीसायन्स पॅपिटलने पोर्टपहलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस (पीएमएस) सुरू करण्याची घोषणा केली आहे. पंपनीने गेल्या अनेक वर्षांत दहा अब्ज रुपयांच्या मालमत्तेचे यशस्वीरीत्या व्यवस्थापन केले आहे. पंपनीने पहिल्या वर्षी 250 कोटी रुपये आणि तीन वर्षांत 1 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे अश्विनी शामी यांनी सांगितले.

एएसजी आय हॉस्पिटलचे ‘व्हिजन 2030’  

एएसजी आय हॉस्पिटलने आज त्यांचा दीर्घकालीन धोरणात्मक रोडमॅप, व्हिजन 2030 जाहीर केला. जनरल अटलांटिक आणि केदारा पॅपिटल या प्रमुख गुंतवणूकदारांच्या पाठिंब्याने, ही संस्था 2030 पर्यंत 1,500 ते 2,000 कोटी रुपये गुंतवण्याची योजना आखत आहे.  यावेळी एएसजी आय हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक-सीईओ डॉ.अरुण सिंघवी उपस्थित होते.

लॉर्डस् मार्ककडून रेनालिक्सचे अधिग्रहण

 लॉर्डस् मार्क इंडस्ट्रीज लि., एक विविधीकृत हेल्थकेअर आणि तंत्रज्ञान-आधारित समूह, यांनी बेंगळुरूस्थित मेड-टेक इनोव्हेटर रेनालिक्स हेल्थ सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेडमधील 85 टक्के हिस्सेदारीचे अधिग्रहण केल्याची घोषणा केली. रेनालिक्स हे पूर्णपणे स्वदेशी, एआय, क्लाउड-सक्षम स्मार्ट हेमोडायलिसिस मशीन विकसित करणारे आहे.