स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून श्रीगोंदामध्ये दोन लाखांची लूट

730

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर रेल्वे स्थानकाजवळील उक्कलगाव रोड या रेल्वे पुलाखाली मुंबईतील संजय कुमार दुखी राय आणि त्यांच्या दोन मित्रांची स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली आहे. घड्याळे हिरामण चव्हाण आणि इकबाल उत्तम काळे (दोघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) रफिक कुंज्या चव्हाण (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) यांनी तीन मोबाईलसह सुमारे 1 लाख 99 हजार रुपयांचा त्यांच्याकडून लुटला आहे. याबाबतची तक्रार बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अवघ्या 6 तासांत आरोपीना जेरबंद केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातंर्गत विसापूर रेल्वे स्थानकाजवळ उक्कलगाव रोडवर रेल्वे पुलानजीक अंधेरी येथील संजय कुमार दुखी राय आणि त्यांच्या दोन मित्रांना स्वस्तात सोन्याचे देण्याचे आमिष दाखवून कुष्णा नावाच्या मित्राने व त्यांच्या साथीदाराने बोलावले. सकाळी 6 वाजता त्यांना बोलवण्यात आले होते. ते आल्यावर त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांच्याकडील 3 मोबाईल आणि 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेत पोबारा केला. याप्रकरणी  संजय कुमार दुखी राय आणि त्यांच्या दोन मित्रांनी बेलवंडी पोलिसांना याबाबत मोबाईलवरून माहिती दिली. त्यानंतर बेलवंडी पोलिसांनी घटनस्थळी घाव घेत घटनेचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 6 तासात  घड्याळे हिरामण चव्हाण, इकबाल उत्तम काळे, रफिक कुंज्या चव्हाण यांना अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे, सहाय्यक फौजदार बजरंग गवळी,रवींद्र देशमुख दादा श्रीरसागर ,प्रकाश बारवकर यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या