राहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना

553

राहाता शहरातील कुंदन लॉनमध्ये लग्न समारंभाच्या कार्यक्रमातून 17 तोळे सोने व 10 हजार रोख असा 7 लाख रूपये किंमतीचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी कुंदन लॉनमध्ये घडली.

श्रीरामपूर येथील उद्योजक मुळे यांच्या कुटूंबातील विवाहासाठी डॉ. मंजुषा नरेंद्र कुलकर्णी या संभाजीनगरहून आल्या होत्या. त्या खुर्चीवर बसल्या होत्या. त्यांच्या बहिनीने त्यांच्याकडे पर्स सांभाळन्यासाठी दिली होती. त्यांनी ती शेजारील खुर्चीवर ठेवली आणि नातेवाईकांशी बोलत होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने त्यांची नजर चुकवून ती पर्स लांबवली. या प्रकरणी डॉ. मंजूषा कुलकर्णी यांनी राहाता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या पर्समध्ये दोन राणीहार व दोन कानातील जोड, साखळी मणी व पदक, नेकलेस , चार बांगड्या, दोन अंगठ्या, एक ब्रेसलेट, सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल, एटीएम कार्ड, पावर बँक असा ऐवज सुमारे 17 तोळे सोने व 10 हजार रूपये रोख असा सुमारे सात लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबवला. या प्रकरणी राहाता पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून लॉनमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरूण हातात पर्स घेऊन जाताना दिसत आहे. काही दिवसांपासून राहाता शहरातील मंगल कार्यालयात अशा चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच गर्दीच्या ठिकाणी गंठनचोरीच्या घटनाही घडल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या