नारायणपेठ, कात्रजमध्ये घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
theft cirme
प्रातिनिधिक फोटो

शहरातील मध्यवर्ती नारायणपेठ आणि कात्रजमधील महावीरनगरमध्ये चोरट्यांनी घरफोडी करून पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी विश्रामबाग व भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कात्रजमधील चंद्रप्रकाश सोसायटी येथे राहणारे प्रदीप प्रभाकर स्वामी (वय 42) यांच्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी करून चोरट्यांनी पावणे दोन लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. चोरट्यांनी कपाटातील 71 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 200 ग्रॅम चांदी असा एकूण 1 लाख 77 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी उषा शिवचंद्र मलकापुरे (वय 79) यांच्या खोलीतून चार हजार रूपये किमतीचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी शंतनु सुनिल शेलार (रा. नारायणपेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.