पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा गैरफायदा चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाकडील रोकडसह महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खडक आणि स्वागरेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीएमपीएल बसने जेष्ठ नागरिक रशीद नायब (वय 63, रा. गंजपेठ) शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रवास करत होते. त्यावेळी चोरट्यांनी बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडील 18 हजारांची रोकड चोरून नेली. बसमधून खाली उतरल्यानंतर नायब यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. याप्रकरणी पोलीस हवालदार अर्जुन कांबळे अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी बसमध्ये गर्दीचा गैरफायदा घेत एका महिलेल्या पर्समधील मोबाईल आणि सोन्याचे दागिने असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास जुनी सांगवी ते स्वारगेट बसस्थानकादरम्यान घडली. याप्रकरणी ए. एस. लोहाटे अधिक तपास करीत आहेत.