साई मंदिरातील दानपेटीसह रोख रक्कम चोरी, चोरट्यांना अटक

17

सामना ऑनलाईन । नाशिक

नाशिकच्या उपनगर परिसरात असणाऱ्या श्री साई मंदिरातील दानपेटीसह रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या 3 दिवसांत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

उपनगर परिसरातील श्री साई मंदिराचं गेट तोडून 22 ऑगस्टच्या मध्यरात्री या चोरट्यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीनं चोरी केली होती. मंदिरातील दानपेटीसह रोख रक्कम आणि इतर सामान चोरून या चोरट्यांनी पोबारा केला होता. मंदिरात चोरी करतानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या दृश्यांमध्ये चोरट्यांनी मंदिराचे गेट तोडून कशापद्धतीने ही चोरी केली हे स्पष्टपणे दिसत आहे. या दृश्यांच्या आधारे चोरट्यांची ओळख पटवून पोलिसांनी सुरज बागूल याला अत्यंत शिताफीने अटक करण्यात यश मिळवले असून त्याच्याकडून चोरलेल्या रक्कमेपैकी 4 हजार रूपयांची रोकड हस्तगत केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या