डाऊच खुर्दमध्ये दोन रोहित्र फोडून हजारांचे ऑइल, कॉपरची चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोपरगाव तालुक्यातील डाऊन खुर्द येथे चोरट्यांनी गुरसळ वस्तीजवळील 25 हॉर्स पावर 100 केव्ही थ्री फेज चालू रोहित्र रविवारी मध्यरात्री फोडून त्यातील ऑइल, कॉपर काढून रोहित्र शेतात फेकून पोबारा केला. रोहित्रच फोडल्याने पिकांना पाणी कसे द्यायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे.

डाऊच खुर्द येथील गुरसळ वस्तीजवळ थ्री फेज लाइन सुरू असलेले दोन रोहित्र खाली उतरवून तो लोखंडी रॉड व इतर हत्यारे वापरून फोडला. त्यामधील ऑइल व 55 कॉपर असे एकूण तीस ते पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. गुरसळ यांनी याबाबत महावितरण कंपनीचे लाईनमन जेजुरकर यांना ही माहिती दिली. रोहित्र, केबल, वीजपंप चोरी होण्याचे प्रकार ग्रामीण भागात नेहमीचेच आहे. त्यातच वीजपंप व इतर वीज साहित्य चोरी होण्याचे प्रमाण जास्त आहे. पावसाने ओढ दिल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये पेरलेल्या सोयाबीन मका ऊस आदी पिके उभी आहेत. सध्या उन्हाचा पारा तीव्र होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी महावितरणने नवीन रोहित्र लवकरात लवकर बसवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

या चोरट्यांचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे. सध्या उन्हाचा पारा तीव्र होत असल्याने पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी महावितरणने नवीन रोहित्र लवकरात लवकर बसवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या चोरट्यांचा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून होत आहे.