हिवाळ्यातील उत्तम आरोग्यासाठी हे पराठे खायलाच हवेत

हिवाळ्यात पराठे खाण्याचा एक अनोखा आनंद असतो. गरम पराठे केवळ चवीलाच अप्रतिम नसतात तर शरीरालाही उबदार ठेवतात. हिवाळ्यात लोक सामान्यतः बटाटा आणि फुलकोबी पराठे खाणे पसंत करतात, पण तुम्हाला माहिती आहे का पराठे बनवण्यासाठी बाजारात इतर अनेक भाज्या उपलब्ध आहेत, ज्यांपासुन स्वादिष्ट पराठे बनवता येतात. भाज्यांपासून बनवलेले पराठे बनवायला अगदी सोपे आणि चवीलाही चविष्ट असतात. तुम्हालाही या हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पराठे खायचे असतील तर पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पराठ्यांच्या रेसिपी जाणुन घ्या.

हिवाळ्यात बटाटा आणि कोबी व्यतिरिक्त मुळा, मेथी, चाकवत आणि पालक वापरून पराठे बनवू शकता. या हिरव्या भाज्या वापरल्याने पराठे चविष्ट बनतात. हे पराठे खाण्यासाठी केवळ चविष्टच नाहीत तर शरीराला देखील अनेक फायदे आहेत. चला त्यांच्या सोप्या रेसिपी जाणून घेऊया.

 

 

मेथीचा पराठा

हिवाळ्यात बाजारात मेथीची पाने मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. मेथीचे पराठे बनवण्यासाठी मेथीची पाने धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर गव्हाच्या पीठात 2 ते3 चमचे बेसन, चिरलेली मेथी घाला. त्यामध्ये आलं लसून पेस्ट, लाल तिखट, हळद आणि तीळ घाला नंतर चवीपुरते मीठ आणि तुप घाला आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. 5 ते 10 मिनीट पीठाला रेस्ट करण्यासाठी ठेवा. त्यानंत पराठा लाटून त्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजून घ्या आणि चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा. मेथीमध्ये जीवनसत्त्वे अ, क, के, लोह, फायबर आणि कॅल्शियम असते, जे शरीराला उबदार ठेवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

 

 

 

 

मुळा पराठा

मुळ्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन सी असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि चांगले पचन राखण्यास मदत करते. मुळ्याचा पराठा तयार करण्यासाठी, प्रथम मुळा किसून घ्या आणि पाणी पूर्णपणे पिळून घ्या. गव्हाच्या पीठात मीठ, आलं लसून पेस्ट, लाल तिखट आणि हळद, चिरलेली कोथिंबीर घाला आणि कणीक मळून घ्या. कणकेचा गोळा तयार करा, त्यात मुळा भरा आणि पराठा बनवा तूप लावून दोन्ही बाजूने खरफुस भाजून घ्या आणि लोणच्यासोबत सर्व्ह करा.

 

 

पालक पराठा

पालक ही एक लोकप्रिय भाजी आहे. ती सामान्यतः भाजी, साग किंवा सूप म्हणून वापरली जाते. तुम्ही ते पराठा म्हणून देखील खाऊ शकता. पालक पराठा बनवणे खूप सोपे आहे. पालकचे पराठे बनवण्यासाठी पालकची पाने धुवून बारीक चिरून घ्या. त्यानंतर गव्हाच्या पीठात 2 ते 3 चमचे बेसन, चिरलेली पालक घाला. त्यामध्ये आलं लसून पेस्ट, लाल तिखट, हळद आणि तीळ घाला नंतर चवीपुरते मीठ आणि तुप घाला आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. 5 ते 10 मिनीट पीठाला रेस्ट करण्यासाठी ठेवा. त्यानंत पराठा लाटून त्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून भाजून घ्या. पालक हा लोह आणि व्हिटॅमिन ए चा एक उत्तम स्रोत आहे, जो अशक्तपणासाठी आणि डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे.

 

चाकवत पराठे

चाकवतचे पराठ्यांमध्ये जीवनसत्त्वे अ, क, के आणि बी६ असतात. शिवाय, ते कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम तसेच प्रथिने आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. चाकवत पराठा बनवण्याची चाकवतची पाने स्वच्छ धुवा. त्यांना थोडा वेळ मिठाच्या पाण्यात भिजवून ठेवा. नंतर ते फार वेळ न उकळवता पाणी काढून टाका. उकळलेले चाकवत थंड झाल्यावर मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या. हे वाटण गव्हाच्या पिठात मिसळा. तुम्ही त्यात तुमच्या आवडीनुसार मसाले, मीठ आणि हिरवी मिरची घालू शकता. पिठाचा गोळा करून त्याचे लहान पराठे लाटा. पराठा दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून खरपूस होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम चाकवत पराठा दही, लोणचे किंवा आपल्या आवडत्या भाजीसोबत सर्व्ह करा.