बनावट छापा टाकून पाच लाख रुपये घेऊन पळाले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुंतवणूकदाराला मोठ्या रकमेचे लोन करून देतो असे सांगून प्रोसेस फीची डील सुरू असतानाच पोलिसांची रेड पडली असल्याचे भासवून पाच लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या अजहर सईद पटेल, गणेश बेलवटकर, रामसिंह डोलगे यांना  कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. रामसिंह हा निलंबित पोलीस हवालदार असून त्याच्या विरोधात फसवणुकीचे काही गुन्हे दाखल आहेत. तक्रारदाराला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता.काही दिवसांपूर्वी त्यांची भेट अजहरसोबत झाली. अजहरने आपण मोठे कर्ज उपलब्ध करून देतो अशा भूलथापा मारल्या. लोनसाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असे सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेवून तक्रारदारान पैसे दिले. तेव्हा रामसिंह हा खाकी पॅण्ट घालून तेथे आला. पोलिसांची रेड पडल्याचे भासवून गणेश आणि अजहर हे पैसे घेऊन पळाले होते.